राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटलिटीच्यावतीने त्यांच्या स्मृतीना अभिवादन करण्यात आले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ अलाईड सायन्सचे समन्वयक डॉ. आर. एस. पाटील यानी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावरील प्रसंगांचे नृत्य- नाटय सादरीकरण केले. यावेळी प्राचार्य रुधीर बारदेस्कर, सिनिअर एच.आर. मॅनेजर राहुल दाते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.